
pune :- महावितरण कडे मागील सहा ते सात महिन्यापूर्वी पैसे भरून पण शेतकऱ्यांना सोलर मिळेना.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी योजनेच्या अंतर्गत असलेल्या मागेल त्याला सोलर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सोलरचा लाभ दिला जातो. महावितरण कडे पैसे भरून पण शेतकऱ्यांना सोलर मिळेना.
सोलर पंप लवकर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी म्हणून सोलर योजना राबवली जात आहे. दरम्यान रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना पाणी असून पण सौर पंप नसल्यामुळे अडचणी येत आहे. याबाबत संबंधी भागात शेतकऱ्यांनी चौकशी केली असता कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळत नाही. शेतकऱ्यांना तातडीने सोलर पंप बसून द्यावा अशी मागणी शेतकरी कडून केली जात आहे.
चालू वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे सिंचन क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे तसेच शेतकऱ्यांनी नवीन कुपनलिका व विहिरी खोदले आहेत. मध्यंतरी निवडणुकीच्या निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना मागील त्याला सोलर योजना राबवण्यात आली पण शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जात नाही. शेतकऱ्यांनी फॉर्म भरून पण व सोलर पंपाची पेमेंट करून पण पंपाचे इंस्टॉलेशन केले जात नाही यामुळे शेतकऱ्यांमधून प्रचंड नाराजीचे प्रमाण आहे.
शेतकऱ्यांचा नवीन फॉर्म भरत असताना काही शेतकऱ्यांचे गट साइटवर ओपन होत नव्हते. त्यामुळे मोठ्या अडचणी आल्या दरम्यान निवडणुकीनंतर पुन्हा सुरू झाली. पैसे भरले मात्र अगोदर आचारसंहिता नंतर रेंगळलेले मुख्यमंत्रीपद तसेच मंत्रिमंडळ विस्तार व मंत्रिमंडळ न वाटप झालेली खाती या गोंधळामध्ये शेतकऱ्यांनी महायितरण कडे भरलेले पैसे पडून आहेत.
शेतकऱ्यांनी भरलेले पैसे पडून आहेत पैसे भरल्यानंतर सोलरची कंपनी निवडता येत नाही त्याचा पर्यायी नाही तर दुसरी नव्या शासनाचा सोलर कंपन्याशी करार झालेला नाही यामुळे शेतकऱ्यांना पैसे भरून पण सोलर मिळण्यास विलंब होत आहे पैसे भरल्यानंतर सोलर पंप कधी मिळेल याबाबत कुठली माहिती दिली जात नाही महावितरण चे याकडे दुर्लक्ष होत आहे.